कर्णकर्कश आवाजात मिरवणूक ,मंडळाच्या अल्पवयीन अध्यक्षासह डीजे मालकावर गुन्हा गणेशोत्सवाचा पहिला गुन्हा श्रीरामपुरात...



श्रीरामपूर : कर्णकर्कश आवाजामध्ये साउंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी शिवराजे युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि साउंड सिस्टीमचे मालक निलेश दादू पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबर रोजी रात्री 7 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 3, बालिका विद्यालयाजवळील शिवसंकल्प चौक येथे आगमन झालेल्या गणेशोत्सवाच्या गणेशमूर्तीच्या मिरवणुकीत पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम वाजविण्यात आली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाले.

आरोपींनी टाटा एस ट्रक क्रमांक एमएच 46 एएफ 6580 वर साउंड सिस्टीम लावून अत्यंत कर्णकर्कश आवाजात गाणी लावली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी व अमलदारांनी आवाज कमी करण्याबाबत सूचना दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 223, 270, 292 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 182 ए/19(4) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. साउंड सिस्टीम जप्त करण्यात आली असून ₹15,000 दंड आकारण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पांडुरंग चौधरी करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या