दिल्ली येथे डॉ. सुस्मिता विखे पाटील यांना ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान


 झरेकाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे 

दिल्ली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत शिक्षण क्षेत्रात आगळेवेगळे कार्य करणाऱ्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांना राष्ट्र सह्याद्री समूहाच्या वतीने दिल्ली येथे ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यालयीन सचिव श्याम जाजू, दिल्ली येथील सुदर्शन न्यूजचे संस्थापक अध्यक्ष सुधीर चव्हाणके,  अरुणनाथ गिरी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन डॉ. सुस्मिता विखे पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत आणि पुरस्काराची घोषणा राष्ट्र सह्याद्री समूहाचे संस्थापक-संपादक करण नवले यांनी केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ऑडिओ अँकर व व्यावसायिक सूत्रसंचालक संतोष मते यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्र सह्याद्रीच्या कार्यकारी संपादिका पूनम नवले यांनी केले.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध चित्रकार रवी भागवत यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेली स्वहस्तनिर्मित चित्रे उपस्थित मान्यवरांना भेट देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांच्या या कलात्मक भेटीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

यावेळी राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले, कार्यकारी संपादिका पूनम नवले, दैनिक राष्ट्र सह्याद्री जाहिरात विभाग प्रमुख दत्तात्रय मेटे,  पत्रकार राजेश गायकवाड, पत्रकार सोमनाथ डोळे, शीतल डोळे, रवींद्र बालोटे, राष्ट्र सह्याद्रीचे राहुरी तालुका प्रतिनिधी राजेंद्र परदेशी, संतोष मते, योगेश कडसकर, आकाश शिंदे , शिवराज नाणेकर, कविता नाणेकर, राष्ट्र सह्याद्री राहता तालुका प्रतिनिधी अशोक दुशिंग,यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील शिक्षणप्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार सोहळ्याप्रसंगी

राष्ट्र सह्याद्री समूहाच्या वतीने गौरव; मान्यवरांची उपस्थिती, चित्रकार रवी भागवत यांच्याकडून स्वहस्तनिर्मित चित्रांची भेट.ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्याने शिक्षण क्षेत्रातून या पुरस्काराचे स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या