मुंबई
मुंबईत उपचार घेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी सकाळी भेट घेतली. ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असलेल्या शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अदानी तिथे पोहोचले. या भेटीमुळे राजकीय गोटात विविध चर्चांना वेग आला आहे.
मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत शरद पवार यांच्या पक्षातून नुकतेच संकेत मिळाल्यानंतर झालेल्या या भेटीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
डिहायड्रेशनच्या त्रासामुळे शरद पवार यांना अलीकडेच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची ही तिसरी वेळ असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
अदानींच्या ताफ्यातील गाड्या रुग्णालयात येतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या भेटीकडे राजकीय आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या