नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधे मद्य आणि मांसाहार बंदी करा; विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार यांची मागणी


 नाशिक 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चक्रतीर्थ येथे पार पडलेल्या धर्मध्वज स्थापना कार्यक्रमादरम्यान विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही शहरांचे धार्मिक महत्त्व आणि पावित्र्य अबाधित राखण्यासाठी त्यांना 'पुण्यक्षेत्र'चा दर्जा देण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोन्ही शहरे देशभरातील लाखो-कोट्यवधी भाविकांची मोठी श्रद्धास्थाने असल्याचे अधोरेखित करत आलोक कुमार यांनी या भागातील मद्यविक्रीवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली. त्यासाठी दोन्ही शहरांतील मद्यविक्रीचे सर्व परवाने तत्काळ रद्द करण्यात यावेत, तसेच या संपूर्ण परिसरात मांसाहार विक्रीवरही संपूर्ण बंदी लागू करावी, अशी भूमिका त्यांनी कार्यक्रमात बोलताना मांडली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या