एसटीच्या 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड सक्तीविरोधात राज्यभरात संताप; निर्णयाविरोधात महिला संघटनांची व्यापक सह्यांची मोहीम


मुंबई

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (एनसीएमसी) सक्तीचे करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात तीव्र नाराजी पसरली आहे. हे स्मार्ट कार्ड मिळवताना सर्वसामान्य प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक, नोंदणी प्रक्रियेतील गोंधळ आणि सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सततच्या मनस्तापामुळे आता राज्यातील महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने या कार्डसाठी केवळ मुदतवाढ देऊन प्रश्न पुढे ढकलू नये, तर ही जाचक सक्ती कायमची रद्द करावी, अशी ठाम मागणी जोर धरू लागली आहे. 'महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदे'च्या पुढाकाराने राज्यातील १०० हून अधिक सामाजिक संघटना एकत्र आल्या असून, या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या